डोंबिवली ( शंकर जाधव ) :- सोमवारी दुपारी साड़े पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील पालिका विभागीय कार्यालयाजवळील पनवेल बस थांब्यासमोर राजू चौधरी या वृद्ध व्यक्तीस रिक्षाचालकाने जोरदार धडक दिली.चौधरी हे एका कुरियर कंपनीत काम करत असून कुरियर घेऊन सायकलीवरून जात होते.वृद्ध व्यक्तीच्या पायाला मार लागला असून त्यांना बसता येत नव्हते.वृद्ध व्यक्तीस रिक्षाचालकाने रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक असताना तो त्याठिकानाहून निघून गेला.वृद्धास काही नागरिकांनी फुटपाथवर झोपवले. या वृद्धास तात्काळ उपचार मिळणे गरजेचे होते.यावेळी दोन नागरिक व डोंबिवली पत्रकार संघाचे सचिव प्रशांत जोशी व उपाध्यक्ष शंकर जाधव यांनी भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांना संपर्क साधुन रुग्णवाहिका या ठिकाणी पाठविण्यास विंनती केली. पाटील यांनी तात्काळ सदर ठिकाणी वेळवर रुग्णवाहिका पाठविल्याने वृद्ध व्यक्तीस पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले.शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपा शुक्ला यांनीही पत्रकार जोशी आणि जाधव यांनी कॉल करून वृद्ध व्यक्तीबाबत माहिती दिली.डॉ.शुक्ला यांनीही यावेळी मदत केली.