29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी Petrol CNG : राज्यातील पेट्रोल, डिझेलचे नवे दर, सोबतच सीएनजी ची काय...

Petrol CNG : राज्यातील पेट्रोल, डिझेलचे नवे दर, सोबतच सीएनजी ची काय स्थिती ?

देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून (Petrolium Company) जारी करण्यात आलेल्या इंधनाच्या नव्या दरानुसार आज पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील काही महिन्यांपासून राज्यात (Maharashtra) पेट्रोल डिझेलचे दर बदलण्यात आले नव्हते. २१ मे रोजी केंद्र सरकारकडून पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीमध्ये (Excise duty) कपातीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर २२ मे रोजी पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपये प्रति लिटरने स्वस्त करण्यात आले. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलेच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukrein War) पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली होती तरीदेखील तेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. परंतु आता कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे. घसरणीनंतर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरवर (Dollar) आले आहेत. तरी सुद्धा देशात इंधनाचे दर कमी न करता स्थिरच ठेवण्यात आले आहेत.

देशासह राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर काय आहेत?

देशाच्या प्रमुख महानगरातील दर पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार –
दिल्ली
पेट्रोल – प्रति लिटर 96.72 रुपये
डिझेल – प्रति लिटर 89.62 रुपये

मुंबई
पेट्रोल – प्रति लिटर 106.35 रुपये
डिझेल – प्रति लिटर 94.28 रुपये

चेन्नई
पेट्रोल – प्रति लिटर 102.63 रुपये
डिझेल – प्रति लिटर 94.24 रुपये

कोलकत्ता
पेट्रोल – प्रति लिटर 106.03 रुपये
डिझेल – प्रति लिटर 92.76 रुपये

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर काय आहेत?

मुंबई
पेट्रोल -106.35
डिझेल – 94.28

पुणे
पेट्रोल – 106.10
डिझेल – 92.58

नाशिक
पेट्रोल – 106.22
डिझेल – 92.70

नागपूर
पेट्रोल – 106.65
डिझेल – 93.14

कोल्हापूर
पेट्रोल – 106.02
डिझेल – 92.54

देशात जरी गेल्या २ महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत नसली तरी सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ सुरू आहेच. मुंबईत आज सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर पीएनजी देखील चार रुपयांनी महागला आहे. सातत्याने वाढत असलेल्या या महागाईचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »