डोंबिवली (शंकर जाधव)
मोक्क्यातील आरोपींचा उत्कृष्टरित्या तपास यंत्रणा राबवून प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल विजय वाघ यांना अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कल्याण परिमंडळ – ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनीही वाघ यांचे कौतुक केले. यावेळी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा गौरवण्यात आला.