डोंबिवली (शंकर जाधव)
रस्त्याच्या कडेला पार्क केलेली रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना पकडून गजाआड करण्यास रामनगर पोलिसांना यश आले. दोघे चोरटे रिक्षाचे पार्ट विकत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत काशीराम शेडगे ( ४९, (मॅकेनिक) रा. पिसवली गाव कल्याण ) आणि २) विक्रम लक्ष्मण साळुखे ( ४३, ( रिक्षा चालक ), रा. चोळेगाव ठाकुर्ली ) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेले दोघे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षा आणि मोटरसायकल चोरी करत होते.
पोलिसांनी दोघांकडून चोरी केलेला एकुण ९५ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. फिर्यादि रिक्षाचालक यांनी २१ तारखेला रात्री ८ वाजता रिक्षा क्र. MH-05/CG-7982 ही हॅन्डल लॉक करून बंदिस्त हॉटेल शेजारी, चोळेगाव तलावाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला पार्क केली होती. ही रिक्षा चोरी केल्याची तक्रार दाखल झाल्यावर रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्याचा तपास सपोनि सानप,पो.हवा सरनाईक, पोअं सांगळे यांनी तपास करताना आजुबाजुच्या सीसीटीव्ही तपासले. यात दोन संशयितांनी ही रिक्षा चोरी करतांना कैद झाले.
चोरी केलेल्या रिक्षाचे पार्ट विक्री करताना पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर दोघांकडून रिक्षा आणि पोलोसांनी हस्तगत केली. सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ -३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (डोबिवली विभाग) सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल बाघ, पोहवा प्रशांत सरनाईक, पो.अ. नितीन सांगळे, पोशि पाटील, पो.शि शिर्के यांनी कामगिरी केली.