डोंबिवली ( शंकर जाधव ) शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करून दोन महिन्यांचा कालवधी उलटला. मात्र आपले सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगत असताना सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केला. यावर शिंदे गटातील माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यापेक्षा कामे करा असा सल्ला दिला. सरकार स्थापन दोन महिने उलटल्यानंत रस्त्यात पडलेल्या खड्डयांंवरून भाजप-शिंदे गट आमने-सामने आल्याचे दिसते.
डोंबिवलीतील एका शाळेतील कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ४७२ कोटी रुपये निधी मंजूर असतानाही त्यावेळच्या सरकारने रद्द केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. यावर शिंदे गटातील माजी नगसेवक म्हात्रे यांनी सोमवारी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले. म्हात्रे म्हणाले, तीन वेळा आमदार झालेल्या चव्हाणांनी नेमके काय काम केले. मंत्री चव्हाण हे विकास कामे करण्यास कमी पडला असून स्वतःची पापे झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करू नये. गेली दोन वर्षे तर आमदारांनी आरोप करण्यातच दिवस घालवले. मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केला असताना म्हात्रे यांनी मात्र अधिकारी अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागते. प्रेमाने संगीतले तर काम करतात. त्यांच्याकडून काम करून घेता आले पाहिजे असे सांगितले.
दरम्यान शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले असताना भापकडून थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जात आहेत. यावरून विद्यमान सरकारमध्ये तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना
अशी परिस्थिती दिसून येत आहे.