डोंबिवली (शंकर जाधव) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रल्हाद म्हात्रे यांची डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. म्हात्रे यांच्या नियुक्तीबाबत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुंबईतही रवींद्र नाट्यमंदिर येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते व दानशूर अशी ख्याती असलेले प्रल्हाद म्हात्रे यांची डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उत्तम वक्ता असलेले म्हात्रे यांनी आजवर अनेक सामाजिक कामे केली. तर गोरगरिबांसाठी मदती करणारे म्हात्रे हे प्रसिद्ध आहेत.
नियुक्तीबाबत म्हात्रे म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जे पद दिले आहे त्या पदाला न्याय देईन. मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करत आहेत. पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच पक्ष वाढीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.