डोंबिवली (शंकर जाधव)
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्था पातळीवरील विज्ञान प्रदर्शन स्पर्धा शनिवार ७ तारखेला ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. आरोग्य पोषण आणि स्वच्छता संसाधन, व्यवस्थापन, उद्योग, कृषी व अन्नसुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थापन, दर्जेदार जीवनासाठी गणित विषयांवर आपले प्रकल्प सादर केले. परीक्षक अमित पाठक आणि वर्षा मेहेतर यांनी गट क्रमांक 1 ( ५ वी ते ७ वी) गट क्रमांक २ ( ८ वी ते १० वी ) यांचे परीक्षण केले.
या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास कोल्हटकर, कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी , संस्थेचे पदाधिकारी , संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. डॉ. कोल्हटकर आणि साळवी यांनी मुलांना विशेष मार्गदर्शन केले.शिक्षकांनी मुलांना प्रकल्प सादर करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. अशाच प्रकारचे प्रकल्प त्यांनी दरवर्षी वेगवेगळ्या नवीन कल्पनेनुसार जिल्हा, राज्य,राष्ट्रीय पातळीवर सादर करावे ज्यामधून उद्याचे भावी वैज्ञानिक नक्कीच बनतील याची खात्री व्यक्त केली.
विद्यार्थांनी आपल्या कल्पनाशक्तीच्याने नवनवीन विषयांवरील कल्पना आपल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मांडाव्या आणि आपल्या प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण करून त्याचे पेटंट कसे करून घेता येईल याकडे विद्यार्थी व त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक लक्ष दिले पाहिजे अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली. विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी आणि पालक यांनी दर्शनीय उपस्थिती दाखवली आणि मुलांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन ज.ए.इ.च्या ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलने अतिशय उत्तम केले होते.
विश्व मराठी संमेलनात डोंबिवलीच्या ऐश्वर्या पुणेकर यांच्या पाककृतीस प्रथम पारितोषिक