डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्यपाल कोश्यारी आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याने मंगळवारी डोंबिवलीत रिपब्लिकन युवा सेना,रिपब्लिकन सेना, बहुजन समाज पार्टी आणि आजाद समाज पार्टी ( भीम आर्मी ) यांनी निषेध मोर्चा काढला होता.डोंबिवली पपश्चिमेकडील स्टेशनसमोरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. पश्चिमेकडून काढण्यात आलेला मोर्चा डोंबिवली पूर्वेला इंदिरा चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यावर समाप्त करण्यात आला. तीन भिमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत,पोलिसांचे निलंबन मागे घ्यावेत आणि पत्रकारावरील गुन्हा मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्यपाल कोश्यारी, प्रसाद लाड आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करत असल्याचे यावेळी आनंद नवसागरे यांनी सांगितले.