29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
HomeKalyan-Dombivliखासदार अरविंद सावंत विरोधात डोंबिवलीत रिक्षाचालकांचे निषेध आंदोलन..

खासदार अरविंद सावंत विरोधात डोंबिवलीत रिक्षाचालकांचे निषेध आंदोलन..

डोंबिवली ( शंकर जाधव )  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार  अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल टीका करताना रिक्षाचालक मुख्यमंत्री असे वक्तव्य केले.अरविंद सावंत यांनी केलेल्या  वक्तव्याविरोधात पूर्वेकडील इंदिरा चौकात एकता रिक्षा चालक मालक संघटनेने  अरविंद सावंत यांचा फोटो असलेला बॅनर जाळत निषेध आंदोलन केले.

     खासदार अरविंद सावंत यांनी  केलेल्या वक्तव्याबाबत एकता रिक्षा चालक मालक संघटनेने निषेध केला. इंदिरा चौकात केलेल्या आंदोलनात अरविंद सावंत यांच्या फोटोला जोडे मारून बॅनर जाळला. आंदोलनात एकता रिक्षा चालक मालक सेना अध्यक्ष सुदाम जाधव, उपाध्यक्ष रामजी राठोड, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर राठोड, अशोक तंवर, विनोद राठोड, पंढरीलाल जाधव, कैलास चव्हाण, संतोष कदम, राजेश भोवले, अविनाश चापल, पप्पू शेख, किरण शेळके,अनिल जाधव,देविदास राठोड, विनोद जयस्वाल यांच्यासह अनेक रिक्षा चालक मालक आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलनकर्त्यांनी  खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.सुदाम जाधव यांनी अरविंद सावंत यांच्या जाहीर निषेध केला.ते म्हणाले, सावंत यांनी रिक्षाचालकांबाबत केलेले विधान चुकीचे आहे.रिक्षाचालक पप्पू शेख म्हणाले , एक रिक्षा चालक राज्याचा मुख्यमंत्री झाला याचा आम्हाला अभिमान आहे. जर एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर रिक्षावाला मुख्यमंत्री का होऊ नये.  अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानामुळे रिक्षा चालकांच्या भावना दुखविण्यात आल्या आहेत. अरविंद सावंत यांनी चुकीचं वक्तव्य केलं आहे. आम्ही कायम रिक्षाच चालवत राहायचं का ? रिक्षा चालक नगरसेवक, आमदार, खासदार काहीही होऊ शकतो. सावंत यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल जाहीर निषेध करतो. रिक्षाचालक मुख्यमंत्री म्हणून टीका केली हे वाईट आहे कुणाच्या भावना दुखवू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »