बॉलीवूड (Bollywood) स्टार्ससोबत त्यांची मुलं देखील काहीना काही कारणांवरून सतत चर्चेत असतात. बरेच स्टारकिड्स आपल्या आई वडलांच्या पावलावर पाय देत सिनेसृष्टीत पदार्पण करतात. याला काहीजण अपवाद नक्कीच आहेत. त्यातील एक म्हणजे आर माधवनचा (R.Madhavan) मुलगा वेदांत. त्याने आपलं करिअर अभिनयात नाही तर स्विमिंगमध्ये (Swimming) करायचं ठरवलं आहे. हे करिअर करताना तो आपल्या पालकांसोबत देशाचं नाव देखील मोठे करत आहे. नुकताच वेदांतने स्विमिंगमध्ये एक नवा विक्रम केला आहे.
आर माधवनच्या मुलगा वेदांतने १५०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारातील लहान गटाचा राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. यामध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आर माधवनच्या मुलाचे खूप कौतुक होत आहे. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Never say never . 🙏🙏🙏❤️❤️🤗🤗 National Junior Record for 1500m freestyle broken. ❤️❤️🙏🙏@VedaantMadhavan pic.twitter.com/Vx6R2PDfwc
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) July 17, 2022
आर माधवनने त्याच्या ट्विटर हँडलवर आपल्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “कधीच नाही म्हणू नका. फ्रीस्टाईल नॅशनल ज्युनिअर रेकॉर्ड तोडलं” असे लिहिले आहे. हे ट्विट करताना माधवनने आपला मुलगा वेदांतला टॅग केले आहे. त्या व्हिडिओ मध्ये वेदांत स्विमिंग पूल मध्ये पोहताना दिसत आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी अनेक युजर्सनी त्याचे अभिनंदन केले आहे.
आर माधवनच्या मुलाची सुवर्णपदक मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील स्विमिंगमध्ये त्याने विविध विक्रम केले आहेत. अलीकडेच त्याने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
आर माधवनबद्दल बोलायचे म्हंटले तर त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. नुकताच त्याचा रॉकेट्री चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आर माधवनने वैज्ञानिक नांबी नारायण यांची भूमिका साकारली होती, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.