मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीचे साधारण कारण हे आरोग्यविषयक चर्चा असे असले तरी अचानक झालेल्या या बैठकीच्या वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेची चुरस राहणार हे यापूर्वीच माहीत होते. तसेच राज्यातील राजकारणाला लोक कंटाळले असून अशी परिस्थिती मनसेसाठी मोठी संधी असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच अंधेरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
“कोणाचा अचानक मृत्यू झाला असेल तर अशा जागांवर मनसे पोटनिवडणूक लढवत नाही. त्यामुळे कोणाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे ते म्हणाले होते. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरे शिंदे गटाला पाठिंबा देतात का? यासोबतच आगामी महापालिका निवडणुकीसाठी या दोघांमध्ये युतीबाबत काही चर्चा झाली का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.