महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात सध्या प्रचंड मोठे बदल आणि अत्यंत वेगाने हालचाली होताना दिसतायत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या राजीनाम्यानंतर आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्टाचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून जाहीर करण्यात आले या सोबतच एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देईल असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्राचे ३०वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी पार पडला. यानंतर त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा मिळाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, या शुभेच्छांसह राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सावध राहून पाऊले टाकण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटरवरू एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा असे ते पुढे म्हटले, आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका… पुन्हा एकदा आपले अभिनंदन! असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
गुढीपाडवा सभेपासून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकार वर लाऊडस्पिकरच्या (Loudspeaker) वादा वरून चांगलाच निशाणा साधला होता.
सकाळी (Twitter) च्या माध्यमातुन एखादा माणूस आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो,” या मुद्द्याला निगडित आशयाची पोस्ट राज ठाकरेंनी शेअर केली होती. काल उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.