मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या त्यांनी राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. शिवसेनेत (Shivsena) उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackrey) बंड करणाऱ्या शिंदे (Shinde Group) गटावर जर वेळ आलीच तर मी त्यांना मनसेत विलिन करण्यावर विचार करेन, असे ते म्हणाले. या वेळीच त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात देखील मोठे वक्तव्य केले.
राज ठाकरे म्हटले की, मी शिवसेनेत बंड केले नाहीत तर मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. माझी तुलना बंडखोरांशी करू नये कारण मी कोणत्याही दुसऱ्या पक्षात गेलो नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलिन होईल असे ऐकले. या तांत्रिक बाबी आहेत. जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलिन करण्याबाबत विचार करेन, असे देखील ते म्हणाले.
यावेळी भाजपासोबत युती करणार का? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी जर तर मध्ये जाण्यात अर्थ नाही. मी तो विचार करत नाहीये. युतीचा विचार करून पक्ष बांधायला घेतला तर बांधला जाणार नाही. या आयत्यावेळी येणाऱ्या गोष्टी आहेत, असे ते म्हणाले. मी भाजपाची स्तुती केली की त्यांच्यासोबत, शरद पवारांशी बोललो की युती करतात की काय अशा चर्चा केल्या जातात, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
यानंतर उद्धव ठाकरेंबद्दल विचारण्या झाल्यावर राज ठाकरे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले ते म्हणाले, तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखा नाही. बाकीच्या लोकांचे वाईट वाटते. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहीत नाही, तेवढे मला माहीत आहे, अशा जहरी शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबाबत आपले मत प्रकट केले. बाळासाहेबांनी फोन केला, दादू इस्पितळात आहे यावर विचारले असता राज यांनी तो भावनेचा विषय होता, आजारपणाचा होता, असे सांगितले.