डोंबिवली ( शंकर जाधव )
जागतिक अंध दिनानिमित्त शनिवारी डोंबिवलीत १०० अंध व्यक्तींनी रॅली काढली. अंधांच्या हातातील पांढरी काठीचा आधार बना, पांढऱ्या काठीचा आधार बना ही जनजागृती करण्याचा रॅली काढण्याचा उद्देश असल्याचे व्हिजन इनसाईड फाऊंडेशन (डोंबिवली) चे संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.
रॅलीचा प्रारंभ डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवरून करण्यात आला. पुढे मॉर्डन कॅफेपासून निघालेल्या रॅली स.वा.जोशी शाळेत शेवट झाला. स.वा.जोशी शाळेत संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या कीर्ती कुलकर्णी, अक्षदा दरेकर, मृणाल कुलकर्णी, विजया शिंदे आणि आशिष पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समर्पण पूरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल , श्रीफळ असे होते. अंधांच्या कल्याणासाठी वाहून घेतलेल्या ६६ वर्षीय सुदाम कर्णिक आणि ६८ वर्षीय यादव झोपे यांचा संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.