रानबाजार या वेब सिरीसची(web series) चर्चा सगळीकडे होत आहे.अनेक मराठी कलाकार ही वेब सिरीज बघितल्या नंतर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर(social media) टाकत आहेत .यात मराठीचा कलाकार कुशल बद्रिके याची या वेब सिरीज बद्दलची पोस्ट(post) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्लॅनेट (planet)मराठी या प्लॅटफॉर्मवर (platform) रानबाजार ही वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित अशा मोठ्या मराठी अभिनेत्रींनी काम केले आहे.अभिजित पानसे यांनी ही वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. या वेब सिरीज बघितल्या नंतर अनेक कलाकारांनी त्याचे कौतुक केले व त्यावर पोस्ट केले पण मराठी कलाकार कुशल बद्रिके याच्या पोस्ट मुळे त्याला प्राजक्ता माळी हिची माफी मागावी लागली पण का मागावी लागली माफी? हे आपण पुढे पाहू

कुशल बद्रिकेची पहिली पोस्ट
‘रानबाजार – एक कमाल वेब सीरिज, वेब सीरिजची टीपिकल गणितं मोडत, समाजाचं आणि राजकारणाचं वास्तव चित्र दाखवणारी ही सीरिज कथेच्या नायकातलं, अती-सामान्यपण आणि सामान्य माणसातला नायक अधोरेखीत करत राहते. सिस्टीम नावाची एक निर्जीव गोष्ट आपल्यातला जिवंतपणा संपवून टाकते हेच खरं. अभिजीत पानसे, तेजस्विनी पंडीत, मोहन आगाशे सर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी काका, अनंत जोग सर, माधुरी पवार यांचा भारावून टाकणारा परफॉर्मन्स या सीरिजचा आत्मा ठरतो. पर्सनली मला ही वेब सीरिज खूप आवडली आणि जाता जाता ते.. “कुंडी लगालो सय्या” गाणं काहीच्या काही केलंय,’ अशा शब्दांत कुशलने वेब सीरिज आणि त्यातील कलाकारांचं कौतुक केलं.
कुशल बद्रिकेच्या या पोस्ट मध्ये त्याने या वेब सिरीजचे तोंडभरून कौतुक केले पण यात प्राजक्ता माळी हिचे कौतुक केले नाही. तिने देखील उत्कृष्ट काम केले आहे असे अनेक प्रेक्षकांचे मत होते. अनेक प्रक्षकांनी असा प्रश्न देखील मांडला यावर उत्तर म्हणून कुशल बद्रिके यांनी एक स्क्रीन शॉट (screenshot) टाकून आजून एक पोस्ट केली .
कुशलची दुसरी पोस्ट
‘मी समस्त न्यूज मीडिया(News media) आणि विशेषतः प्राजक्ता माळीचे चाहते यांची क्षमा मागतो. प्राजक्ताचं नाव लिहायचं चुकून राहिलं. प्राजक्ता, पांडू या सिनेमातली माझी सहकलाकार आहेच, शिवाय ती माझी खुप चांगली मैत्रीणसुद्धा आहे. तुमच्या या न्यूजमुळे आता ती बहुतेक दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जुन जे उटणं, तेल वगैरे गिफ्ट म्हणून पाठवते ते पाठवणार नाही. तुम्हाला त्याचं पाप लागेल आणि तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली आंघोळ चुकेल. प्राजक्ता तू मस्त काम केलंस यार. तुला पर्सनली सॉरी म्हणतो. बाकी सगळ्या कलाकारांनीच काय तर त्या घुबडानेसुद्धा भारी काम केलंय, अशी पोस्ट त्याने लिहिली. कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर काहींनी त्याच्या विनोदबुद्धीचं कौतुक केलं आहे.