29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी रणवीरच्या 'त्या' फोटोबाबत अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, व्हॅनिटीमध्ये जायची वाटायची भीती

रणवीरच्या ‘त्या’ फोटोबाबत अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, व्हॅनिटीमध्ये जायची वाटायची भीती

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. काही लोक त्याची स्तुती करत आहेत तर काही लोक त्याला ट्रोल करत आहेत. या दरम्यान त्याची सह-अभिनेत्री परिणीती चोप्राची (Parineeti Chopra) एक मुलाखत खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने रणवीर सिंगच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. ती त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला घाबरते. विशेष म्हणजे तिने यामागचे जे कारण उघड केले ते ऐकून केवळ तुम्हालाच नाही तर दीपिकालाही आश्चर्य वाटेल.

परिणीती चोप्राने एका मुलाखतीत खुलासा केला की तिने रणवीर सिंगला अनेकदा उघडे पाहिले आहे. विशेष म्हणजे परिणीतीने रणवीरसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर रणवीर तिच्या पहिल्या चित्रपटातही तिच्यासोबत होता. ती म्हणाली होती की ती कोणाच्याही व्हॅनिटीमध्ये सहज बसू शकते. मात्र, रणवीरच्या व्हॅनिटीमध्ये जाण्यासाठी विचार करावा लागतो. कारण रणवीर अनेकदा कपड्यांशिवाय बसलेला असतो. मी त्याला अनेकदा विना कपड्यांचे पाहिलं आहे असे देखील ती त्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतेय.

यादरम्यान परिणीतीने असेही सांगितले की, ती एकदा मेकअप करत होती. नंतर तिने मागे वळून पाहिले तर रणवीर त्याची पॅन्ट काढत होता. इतकंच नाही तर परिणीती म्हणते की रणवीरला जेव्हा जास्त लोक असतात तेव्हा पॅन्ट काढायला आवडते.

रणवीर लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे. यातील ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘उचाई’ चित्रपटात परिणीती चोप्रा दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »