31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeउद्योगजगतमहागाई नियंत्रणात येत नसल्या कारणाने रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतला निर्णय

महागाई नियंत्रणात येत नसल्या कारणाने रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतला निर्णय

आता पुढील १-२ महिनेच स्वस्त कर्ज घेण्याची संधी राहणार आहे. महागाई नियंत्रणात येत नसल्या कारणाने रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve bank of India) वर दबाव वाढला असून पुढील एक दोन महिन्यात कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. संशोधन संस्था नोमुरा ने असा अंदाज व्यक्त केला आहे की रिझर्व बॅंक या बैठकीत व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करू शकते. जर आरबीआयने व्याज दरात वाढ केली तर कर्ज महाग होणार असून ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे.


मे 2020 पासून रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लोकांना स्वस्त कर्ज उपलब्ध होण्यासाठी आणि कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी बँकेने निचांकी पातळीवर व्याजदर स्थिर ठेवले आहेत. अर्थतज्ञ म्हणतात की चलन वाढीचा वाढलेला दर आणि महागाईला रोखण्यासाठी येत असलेले अपयश याला रोखण्यासाठी आरबीआय जून महिन्यापासून व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात करेल.
नोमुराने अंदाज व्यक्त केला आहे की, रिझर्व बँक अर्थव्यवस्था वाढीसाठी पैशांचा प्रवास वाढविण्याचे प्रयत्न आता थांबवताना दिसून येईल अशा स्थितीत जूनच्या बैठकीत रेपोदरात ०.२५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहेत तर ऑगस्ट किंवा ऑक्टोबर च्या बैठकीत ०.५० टक्के वाढ होऊ शकते.


घाऊक किमतीवर आधारित महागाई मार्चमध्ये चार महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर १४.५५ टक्क्यांवर पोहोचली आहे. भाज्यांचे दर कमी झाले असले तरी महागाई मधील ही वाढ प्रामुख्याने वस्तूंच्या किमती आणि कच्च्या तेलाचे दर वाढल्याने आली आहे. महागाई वाढल्याने अमेरिकेच्या (America) मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँक (Federal Reserve Bank) ५० बेसिस दराने व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »