31 C
Mumbai
Friday, May 19, 2023
HomeKalyan-Dombivliडोंबिवलीत महिला रिक्षाचालक अधिकृत रिक्षा स्टॅडच्या मागणीला आरटीओकडून पाठ

डोंबिवलीत महिला रिक्षाचालक अधिकृत रिक्षा स्टॅडच्या मागणीला आरटीओकडून पाठ

डोंबिवली ( शंकर जाधव ):- पुरुषांप्रमाणे महिलावर्गहि काम करून आपल्या कुटुंबाचे घर चालविले. यात रिक्षा चालविण्यात महिला मागे नाहीत. नेहमीप्रमाणे सकाळी घरातील कामे आवरून रिक्षा किक मारली कि सायंकाळी घरी परतणे हे दैनदिन जीवन जगणे महिला रिक्षाचालकांना चांगलेच जमले.आता यात अडचण आली ती स्वतंत्र रिक्षा स्टॅडची. आपल्यालाही स्वतंत्र रिक्षा स्टॅड मिळावा अशी मागणी येथील महिला रिक्षाचालकांनी केली.पण या मागणीकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण उपशाखेने लक्ष दिले नाही.गेली दोन महिने हि मागणी होत असून महिला रिक्षाचालकांना अधिकृत स्वतंत्र रिक्षा स्टॅड उभे करण्याची परवानगी का दिली नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

 डोंबिवली पश्चिम आणि पूर्वकडे एकूण २५ महिला रिक्षाचालक आहेत.या महिला रिक्षाचालक अनेक रिक्षा स्टॅडवर आपली रिक्षा उभी करतात.आपला स्वतंत्र अधिकृत रिक्षा स्टॅड असावा यासाठी या सर्व महिला रिक्षाचालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि  शहर वाहतूक नियंत्रण उपशाखा , डोंबिवलीला कळविले. मात्र याकडे लक्ष दिले नसल्याने महिला रिक्षाचालकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. ठाकुर्लीत राहणाऱ्या नैना नाईक म्हणाल्या, माझे दहावी पर्यत शिक्षण झाले.पतीला संसारात हातभार लावावा याकरता कुरियर कंपनीत काम केले.मला वाहन चालविण्याची खूप आवड आहे. मी विचार केला कि आपली आवड हिचे आपले करीयर क्करून कुटुंबाला हातभार लावावा याकरता रिक्षा चालविण्याचे ठरविले.रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन डोंबिवलीत रिक्षा चालविण्यास सुरुवात केली.चार वर्षापासून रिक्षा चालविते.आम्हाला स्वतंत्र अधिकृत रिक्षा स्टॅड द्या अशी मागणी आम्ही केली. मात्र आमच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली.

 दरम्यान शहरात चौकाचौकात, गल्लीगल्लीत अनधिकृत रिक्षा स्टॅड असून त्यावर मात्र आजवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई झाली नाही वर्षातून एका डोंबिवलीचे दर्शन घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी रिक्षा स्टॅडच्या सर्वे करण्यासाठी येतात. त्यानंतर हे कागदी घोडे कुठे नाचविले जातात हे अद्याप माहित पडले नाही. शहारात इतकी अनधिकृत रिक्षा स्टॅड असतील तर त्यावर कारवाई होत नाही मात्र स्वतंत्र महिला स्टॅडची मागणीकडे कानाडोळा केला जात आहे असे यातून दिसून येते.

आपल्या पायावर उभे राहणाऱ्या महिला रिक्षाचालकांना खर तर प्रशासनाने पाठिंबा देवे आवश्यक आहे. डोंबिवलीत शहरात इतकी अनधिकृत रिक्षा स्टॅड आहेत. त्याकडे  उपप्रादेशिक परिवहन विभागाने पाठ दाखवली आहे हे सत्य आहे. या महिला रिक्षाचालकांच्या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करू.

सचिन साळवी – प्रवासी मंच 

या प्रशासनाला आता काय म्हणावे तर कळतच नाही. गेली दोन महिने या महिला रिक्षाचालक स्वतंत्र रिक्षा स्टॅडची मागणी करत असतील तर परवानगी का दिली जात नाही ? या मागणीसाठी MH05 वाहतूक संघटना प्रशासनाकडे पाठपुरावा करेल.

वंदना सोनावणे

महिला रिक्षाचालकांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेना मदत करील. प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नसतील तर रिक्षा स्टॅड उभे करून देऊ.मनसेने महिलांन नेहमीच मदत करत असते. लवकरच डोंबिवलिटील महिला रिक्षाचालकांशी चर्चा करू.

मनसे वाहतूक सेना जिल्हा संघटक – अनिल वालेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »