28 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी ग्रामीण भागातील चार रस्त्यांसाठी ३२६ कोटींच्या निविदा जाहीर, खा. डॉ. श्रीकांत शिंदे...

ग्रामीण भागातील चार रस्त्यांसाठी ३२६ कोटींच्या निविदा जाहीर, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

डोंबिवली ( शंकर जाधव ) शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कॉंक्रिट रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणखी आठ गावांचे जोड रस्ते कॉंक्रिटचे केले जाणार आहेत. उसरघर, निळजे, घेसर, कोळे, हेदूटणे, माणगाव आणि भोपर या गावांना जोडणाऱ्या चार रस्त्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा जाहीर केली आहे. यात उसरघर – निळजे – घेसर या रस्त्याच्या कामासाठी १०७.१४ कोटींची, निळजे – कोळे – हेदूटणे आणि उसरघर – घारीवली या दोन रस्त्यांसाठी १२३.४९ कोटी तर हेदूटणे – माणगाव – भोपर या रस्त्यासाठी ९५.९९ कोटी रूपयांची निविदा एमएमआरडीएच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी ३६० कोटी, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी १०० कोटी तर इतर रस्त्यांसाठी २०० हुन अधिक कोटींच्या निधीमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सुमारे १ हजार कोटींचा निधी मिळवण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यश आले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शहरी भागासह ग्रामीण भागाचाही तितकाच समावेश आहे. त्यामुळे शहरी भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी सक्रीय असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ग्रामीण भागातही रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे विणण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रयत्न केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांमधून कोट्यावधींचा निधा कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विकसीत केल्यास त्याचा गावांना फायदा होऊन गावाचा विकास होईल. याहेतून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध केला जातो आहे. या सोबतच कल्याण शहराच्या वेशीवर असलेल्या अनेक गावांमध्ये रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची आवश्यकता होती. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएच्या वतीने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीही मंजूर झाला होता. एमएमआरडीएच्या वतीने नुकतीच या रस्त्यांसाठी निविदा जाहीर केली आहे. यात उसरघर, निळजे, घेसर, कोळे, हेदूटणे, माणगाव आणि भोपर या आठ गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा यात समावेश आहे. एकूण ३२६ कोटी रूपयांची ही कामे आहेत. यात उसरघर – निळजे – घेसर या रस्त्याच्या कामासाठी १०७.१४ कोटी, निळजे – कोळे – हेदूटणे आणि उसरघर – घारीवली या दोन रस्त्यांसाठी १२३.४९ कोटी रूपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. तर हेदूटणे – माणगाव – भोपर या रस्त्यासाठी ९५.९९ कोटी रूपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने कामाचे कार्यादेश दिले जाणार असून कामालाही लवकरच सुरूवात केली जाईल, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या ३२६ कोटींच्या निधीमुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १ हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी मिळवण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यश आले आहे.

चौकट: रस्त्यांसाठी आतापर्यंत १ हजार कोटी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र – ३६० कोटी

डोंबिवलीतील औद्योगिक क्षेत्र – १०० कोटी

इतर रस्त्यांसाठी – २०० कोटी

आता ग्रामीण रस्त्यांसाठी – ३२६ कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »