शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबईतील (Mumbai) चाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेच्या प्रकरणात ईडीकडून (ED) रविवारी रात्री अटक (Sanjay Raut Arrest) करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रिंग (Money Laundring) प्रकरणी ईडी कडून ही अटक करण्यात आली. परंतु आज त्यांची ईडी कोठडी संपली असून त्यांना आज ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली असल्याने पुढचे चार दिवस त्यांना ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. सुरुवातीला ज्यावेळी ईडीने त्यांना ताब्यात घेतलं होतं, तेव्हा ईडीने कोर्टाकडे (Court) आठ दिवसांची कोठडी मागितली होती परंतु त्यावेळी कोर्टाने त्यांना चार दिवसाची ईडीची कोठडी दिली.
स्वप्ना पाटकर गोरेगाव पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. स्वप्ना पाटकरांच्या यांच्या वकीलांनी ज्यावेळी युक्तीवाद वादाला सुरुवात केली तेव्हा संजय राऊत माझ्या क्लाईन्टला धमकावत असल्याचे वकीलांनी कोर्टात सांगितले. कोर्टाने स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांना सवाल केला आहे की, संजय राऊत अटकेत असताना ते कशी काय धमकी देऊ शकतात?
संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची मागणी करताना ईडीने दावा केला आहे की, राऊत आणि त्याच्या कुटुंबाला मुंबईतील चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील कथित अनियमिततेतून गुन्ह्यातून एक कोटी रुपये मिळाले आहेत. हे प्रकरण गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील अनियमितता आणि आर्थिक मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. संजय राऊत यांनी मात्र आपल्यावरील आरोप अस्पष्ट असून ते राजकीय सूडबुद्धीच्या भावनेतून लावले असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर अजून काही जणांना अटक होणार असल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी काही राजकीय नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे. जेव्हापासून संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. तेव्हापासून महाराष्ट्रातील सध्याचे विरोधक दिल्लीतील नेते सुडबुद्धीने कारवाई करीत आहेत अशी टीका करीत आहेत.