डोंबिवली (शंकर जाधव) भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य लवकरात लवकर देण्याची मागणी केली होती. मंगळवारी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी पालिकेच्या विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षण मंडळ कार्यलयात धडक दिली.
माजी नगरसेवक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षण मंडळ कार्यालयात गेले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पुषगुच्छ देत उपहासात्मक सत्कार केला. पालिका शाळांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पालिका शाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून अद्यापही शालेय गणवेश अन्य शालेयपयोगी वस्तू देण्यात आले नाहीत. विद्यार्थ्याना वीणा गणवेश किंवा जुने गणवेश घालत शाळेत जाण्याची नामुष्की ओढवली आहे. शिक्षण विभागाच्या अश्या कामकाजाचा निषेध नोंदवण्यासाठी माजी नगरसेवक शिंदे यांच्या सह पालिका शाळा मधील विद्यार्थ्यांनी कल्याण पूर्व पत्रिपुलापसून पायी चालत कल्याण पश्चिम सहजानंद चौक येथील शिक्षण मंडळ कार्यालय गेले.विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी पालिकेच्या विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य का मिळाले नाही ? पालिका प्रशासन शाळांकडे का लक्ष देत नाही असा प्रश्न पडल्याचे माजी नगरसेवक शिंदे यांनी सांगितले.