३ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईवरून गोव्याला जाताना कॉर्डिलीय क्रूझवर एनसीबीने (NCB) छापा टाकला होता ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स (Drugs) जप्त करण्यात आले होते. या क्रूझवर शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांच्या सोबतच अजून २० जणांना अटक केली होती. त्यामुळे आर्यन खानला तुरुंगात राहावे लागले त्यानंतर नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून कोर्टाच्या सुनावणीनंतर बऱ्याच दिवसांनी त्याला क्लीन चीट मिळाली.
गेल्या गुरुवारी आर्यन खानने विशेष एनडीपीएस कोर्टामध्ये आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. एनसीबीच्या आरोपपत्रामध्ये त्याचे नाव नसल्याने त्याला त्याचा पासपोर्ट परत द्यावा अशी विनंती त्याने न्यायालयाला केली आहे. याबाबत न्यायालयाने उत्तर दाखल करण्याचा निर्देश दिला आहे व त्याची सुनावणी १३ जुलैला होणार आहे.
या प्रकरणात आर्यन खान सोबत अरबाज मर्चंट,मुनमुन धमेचा,मानव सिंघल,समीर सिंघल,भास्कर अरोरा,विक्रांत छोकर,नूपुर सतीजा,मोहक जैसवाल,इशमीत सिंह,गोपाल आनंद,गोमती चोप्रा,ओकोरो उजेओमा,शिवरान हरिजन,चिनेड्डू इग्वे, अचीत कुमार यांना देखील अटक करण्यात आली असून आता आर्यन खान सह अजून सहा जणांना क्लीन चीट मिळाली आहे.