28 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी Aryan Khan Case : शाहरुख चा मुलगा आर्यन खानला NCB ची...

Aryan Khan Case : शाहरुख चा मुलगा आर्यन खानला NCB ची क्लीन चीट….वाचा पूर्ण रिपोर्ट

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ‘क्लीन चिट‘ दिली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. आर्यन खानला एनसीबीने गेल्या वर्षी मुंबईत क्रूझ छाप्यादरम्यान इतर अनेकांसह अटक केली होती आणि त्यांच्याकडून ड्रग्ज (Drugs) जप्त केल्याचा दावा केला होता. अनेक आठवडे तुरुंगवास भोगल्यानंतर आर्यन खानला कोर्टातून जामीन मिळाला.

ड्रग-ऑन-क्रूझ प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आरोपी बनवले गेले नाही. एनसीबीचे डीडीजी (ऑपरेशन) संजय कुमार सिंग (Sanjay Kumar Singh) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एनसीबी अधिकाऱ्याच्या निवेदनात म्हटले आहे की एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुराव्याअभावी उर्वरित 6 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली जात नाही.


काय होते संपूर्ण प्रकरण, आर्यनला का अटक करण्यात आली?
आर्यन खानला 2 ऑक्टोबर 2021 च्या रात्री मुंबईतील क्रूझ शिप टर्मिनलमधून एनसीबी टीमने पकडले होते. आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंटलाही एनसीबीने पकडले. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर ड्रग पार्टी होणार होती आणि आर्यन खान या पार्टीत सहभागी होणार असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. एनसीबीला आर्यनजवळ अमली पदार्थ सापडले नसले तरी अरबाजच्या शूजमधून ड्रग्ज पकडण्यात आले.

आर्यन खान काही दिवस एनसीबीच्या कोठडीत होता, त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आर्यनला मुंबईतील आर्थर जेलमध्ये ठेवण्यात आले असून त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने दोनदा फेटाळला होता. जवळपास २६ दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिल्यानंतर 28 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन खानला कोर्टातून जामीन मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »