डोंबिवली (शंकर जाधव)
उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याने डोंबिवली पूर्वेतील भाजी मार्केट येथील डोंबिवलीतील शंकर मित्र मंडळाच्या उपक्रमातून दिसते.यावर्षी दहीकाला उत्सवात मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र (भाऊ) पाटील यांनी हे स्वतः क्षितिज संचालिका गतिमंद मुलांच्या शाळेच्या शिक्षिका विजया शिंदे व सचिव रजनी कदम यांच्याकडे धनादेश सुपूर्द करणार आहेत. या शाळेतील एका गतिमंद मुलाचा वर्षांचा शैक्षणिक खर्च सात हजार होतो. याकरता दानशूर व्यक्तींनी पुढे करून या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलावा असे आवाहन संस्थेच्या संचालिका दळवी यांनी केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत शंकर मित्र मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे.