आंदोलनाकर्त्या महिलांची माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी
डोंबिवली ( शंकर जाधव ):- अनेक वर्षापासून राहत असलेल्या इमारतीचे पाणी कनेक्शन कापल्याने व इमारतीसमोरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम रखडल्याने हवालदिल झालेल्या महिला वर्गाने शुक्रवारी रात्री याच रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले होते.’माय मराठी वेब पोर्टल’ हे वृत्त प्रसारित करताच दखल शिवसेनेने माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे दखल केली.शनिवारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी यांनी सदर ठिकाणी पाहणी करून महिला वर्गाचे म्हणणे ऐकले.

डोंबिवली पूर्वेकडील पी अँड टी कॉलनीजवळील नांदिवली टेकडीलगत असलेल्या शांतीदर्शन इमारतीतील महिलांनी इमारती समोर रखडलेल्या रस्ता काँक्रिटीकरण येथे ठिय्या आंदोलन केले.येथील पाण्याच्या पाईपाला साकडे घालत चक्क पाईपाची आरती ओवाळली.शिवसेनेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सदर आंदोलनाची दखल घेतली.शनिवारी दुपारी संबंधित विभागातील अधिकारी यांना बरोबर घेऊन याठिकाणची पाहणी केली.शांताराम दर्शन, अंबर तीर्थ, नवश्री संकल्प व ईतर सोसायटी मधील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. सदर विभागातील नागरिकांचा पाण्याचा व इतर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावे याकरिता संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिले. यावेळी उपतालुकाप्रमुख प्रमुख रवी म्हात्रे, नांदिवली विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, उपविभाग प्रमुख अनिल वत्रे, अशु सिंह , स्वप्निल विटकर, पवन म्हात्रे आदी उपस्थित होते.