पालिका अधिकाऱ्यांना सुनावले…
( शंकर जाधव ):- डोंबिवली जवळील ठाकुर्ली स्टेशन जवळील संतवाडी , म्हसोबा नगर येथील झोपडपट्टीवर बुलडोझर फिरणार असल्याने येथील रहिवासी रस्त्यावर उतरले.आपली घरे तूटणार,संसार उघडण्यावर पडणार या चिंतेने महिलावर्ग संतापल्या होत्या.या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे व कार्यकर्ते मदतीला धावले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांनी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना निर्देश देत गरिबांची घरे वाचविण्यासाठी सदर ठिकाणी जाण्यास सांगितले.शहरप्रमुख मोरे आणि उपशहर प्रमुख सुनील भोसले यांनी डोंबिवली पूर्वेकडील संतवाडी , म्हसोबा नगर येथे धाव घेतली. मोरे यांनी तेथील ११९ रहिवाश्यांना भेट घेत चर्चा केली.त्यानंतर मोरे यांनी महापालिका अधिकारी यांना सुनावत ‘आधी पुनर्वसन करा तरच घरे खाली करू, तुम्ही पुनर्वसन करतेवेळी घराची चावी आणि घर देत असल्याचे पत्र द्या , आम्ही स्वतः हुन घरे खाली करू. खासदार साहेब स्वतः लक्ष देत आहेत असे सांगितले.तर मोरे यांनी येथील रहिवाश्यांना निश्चिंत राहण्याचे आश्वासित करून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी उभे आहेत याची खात्री दिली.आपली घरे वाचविल्याबद्दल सर्व रहिवाश्यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे आभार व्यक्त केले.