शिवसंपर्क अभियान बैठकीत शिवसैनिकांचा निर्धार
प्रतिनिधी, ३० मे २०२२ – आगामी महापालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून या निवडणुकीत ( Election) यावेळी काळेवाडी (Kalewadi) प्रभाग क्रमांक ३१ मधील तीनही जागांवर शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार निवडून आणून भगवा फडकविणार, असा निर्धार काळेवाडीतील तमाम शिवसैनिकांनी शिवसंपर्क अभियान बैठकीत केला.
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाचा झंझावात चालू आहे. या अभियानांतर्गत २७ मे रोजी काळेवाडी विभागाची बैठक पार पडली.

या बैठकीला शिवसेना पुणे (Pune) जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिवसेना समन्वयक वैभव वाघ, जत संपर्कप्रमुख तानाजी गुरव, प्रसिद्ध व्याख्यात्या विद्या घोडे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले, उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, संघटिका अनिता तुतारे, उपसंघटिका शारदा वाघमोडे, माजी शहर संघटिका सुनिता चव्हाण व काळेवाडी रहाटणीतील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

या बैठकीत संपर्कप्रमुख सचिन अहीर व खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसैनिकांसोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेतल्या. शिवसैनिकांना संघटनात्मक पातळीवर येत असलेल्या सर्व समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, याची ग्वाही खा. गोडसे यांनी दिली. व आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा. सचिन अहिर व खासदार मा. हेमंत गोडसे यांचा विठ्ठल-रुक्मिणी यांची मुर्ती देऊन उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
बैठकीचे आयोजन उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रशांत तरवटे, विभाग संघटक सुनिल पालकर, विभाग समन्यवक राजेंद्र पालांडे, युवा संघटक संजय संधु, उपविभागप्रमुख सागर शिंदे, माजी विभागप्रमुख अरुण आंब्रे, शाखा प्रमुख गणेश झिळे, जगदिश येवले, भरत शिदे, विजय शितोळे, रोहन पालकर, प्रतीक महातो, संदीप यादव, रवी शेलार, अमित धोबी, अभिषेक पांचाळ, ऋषि ननावरे, गोलू भुरा, किशोर भोंगळे, अनिरुध्द पालांडे, गौरव केरकर, राहुल पालीवाल, रवि रहाटे, अमोल राठोड, विभागातील महिला पदधिकारी व शिवसैनिक यांनी केले.