डोंबिवली (शंकर जाधव)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आउट गोइंग सुरु असताना या पक्षात मनसे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश झाला. यावरून ठाकरे गटात देखील इनकमिंग सुरु झाल्याचे दिसत आहे. मनसेचे कल्याण उपशहर संघटक रुपेश भोईर यासह अनेकांनी यांनी मातोश्री येथे मंगळवारी शाखाप्रमुख व पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या या सोडचिठ्ठीमुळे कल्याणात मनसेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. मनसे पक्ष स्थापनेपासून झेंडा खांद्यावर घेत पक्षासाठी पूर्णवेळ कार्यरत असणारे मनसे कल्याण उपशहर संघटक रुपेश भोईर यांनी शाखाप्रमुख व शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मनसे पक्षाचे पालिकेत आधी 27 नगरसेवक होते. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून कल्याण डोंबिवलीत मनसे पक्षाकडे पाहिले जाते. मनसे पक्षातून शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षात मनसेचे कल्याण उपशहर संघटक रुपेश भोईर यासह अनेकांनी प्रवेश केला आहे.