स्पेनमधील (Spain) महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत स्पेन सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता या कालावधीत महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ३ दिवसांची मासिक रजा दिली जाणार आहे. मासिक पाळीच्या काळात महिला कामगारांना दर महिन्याला तीन दिवस सुट्टी देणारा स्पेन हा पहिला पाश्चात्य देश ठरणार आहे.
स्पॅनिश सोसायटी ऑफ गायनॅकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्सचा दावा आहे की मासिक पाळी असलेल्या सुमारे एक तृतीयांश महिलांना तीव्र वेदना होतात. या दुखण्याला डिसमेनोरिया म्हणतात. डिसमेनोरियाच्या लक्षणांमध्ये तीव्र ओटीपोटात दुखणे, डोकेदुखी, अतिसार आणि ताप यांचा समावेश होतो. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली जाईल. या योजनेत महिलांच्या मासिक पाळीत आरोग्य सुधारण्यासाठी इतर उपायांचाही समावेश आहे. स्पेनमध्ये शाळांना गरजू मुलींना सॅनिटरी पॅड (sanitary pad) देणे बंधनकारक आहे.
या निर्णयामुळे स्पेनमधील महिला आणि मुलींना परवडणाऱ्या किमतीत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होणार आहेत. कारण स्पेन सरकारने त्यावरचा व्हॅट हटवला आहे. स्पॅनिश महिलांनी सुपरमार्केटमधील (supermarket) सॅनिटरी पॅडच्या विक्रीच्या किमतीतून व्हॅट कपात करण्याची मागणी केली आहे, या मागणीचाही मसुद्यात विचार करण्यात आला आहे