35 C
Mumbai
Wednesday, April 19, 2023
HomeKalyan-Dombivliकल्याण डोंबिवली नगरीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

कल्याण डोंबिवली नगरीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

डोंबिवली (शंकर जाधव): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, केंद्र शासनाच्या शहरी कार्य मंत्रालयातर्फे देशातील स्मार्टसिटी मध्ये ‘FREEDOM TO WALK, CYCLE AND RUN CAMPAIGN’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशभरातील एकूण ३१ शहरांनी सहभाग घेतला. १ फेब्रुवारी ते १७ मार्च या ४५ दिवसांच्या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली नगरीतर्फे अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी (एसकेडीसीएल) प्रल्हाद रोडे, पालिकेचे उपआयुक्त (कडोंमपा) सुधाकर जगताप, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहाय्यक अभियंता अजित अरविंद देसाई, उद्यान अधिक्षक अनिल तामोरे-(प्र.),सहाय्यक पोलीस आयुक्त्त उमेश माने पाटील, वाहतूक नियंत्रण उपशाखा ( डोंबिवली ) शाखा पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड , सहाय्यक पोलीस‍ निरीक्षक नितीन सुर्यवंशी हे अधिकारी सहभागी झाले होते.

केंद्र शासन आयोजित स्पर्धेत चालणे (२,०३६ किमी), धावणे (१,४८३ किमी), सायकलींग (८,२५४ किमी) या तीनही कॅटेगिरीमध्ये देश पातळीवर कल्याण डोंबिवली नगरीने “द्वितीय क्रमांक” पटकावला असून वैयक्तिक कामगिरीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता अजित अरविंद देसाई यांनी धावण्यामध्ये ‘प्रथम क्रमांक’ (एकूण ११४३ किमी) पटकावला असून सायकलींग मध्ये अतिरिक्त आयुक्त पोलीस दत्तात्रेय शिंदे यांनी ‘तृतीय क्रमाकांचा’ (४७५० किमी) बहुमा‍न मिळविला आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाचे (प्र.)अधिक्षक अनिल तामोरे यांनी चालण्यामध्ये ‘तृतीय क्रमांक’ (९८७ किमी) पटकावला असून एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी चालण्यामध्ये देश पातळीवर ‘७वा क्रमांक’ (५५६ किमी) तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सुर्यवंशी यांनी सायकलींगमध्ये ‘५वा क्रमांक’ (१६८१ किमी) आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सायकलींगमध्ये ९वा क्रमांक (११४८ किमी) मिळविला आहे.

गतवर्षी केंद्रशासन स्तरावर आयोजिलेल्या “FREEDOM TO WALK” या स्पर्धेमध्ये देश पातळीवर प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविल्यानंतर या वर्षीही “FREEDOM TO WALK, CYCLE AND RUN CAMPAIGN” या तिन्हीही इव्हेंटमध्ये देश पातळीवर द्वितीय क्रमाकांचा बहुमान प्राप्त झाल्याने कल्याण डोंबिवली नगरीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »