गुरुपौर्णिमेच्या (Gurupournima) निमित्ताने एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. आषाढीनंतर येणाऱ्या गुरुपौर्णिमेसाठी एसटी महामंडळाचा (MSRTC Bus) ठाणे विभाग सज्ज आहे. त्यामुळे कोविडनंतर भाविकांमध्ये आता भक्तीचा गजर घुमणार आहे. गणेशपुरी,शिर्डी,अक्कलकोट,खोपोली अशा धार्मिक ठिकाणी या बस सेवा चालवल्या जाणार आहे. ठाणे विभागाकडून या विशेष बस चालू होणार आहेत. त्यामुळे ज्या भाविकांना गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंचे दर्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
कोविड १९ नंतर पुन्हा एकदा सर्व सुरळीत सुरु झाले आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून सर्व देवस्थळे बंद होती. त्यामुळे भाविकांना तिथे जात येत नव्हते. आता या जादा गाड्या चालविल्याने भाविक मोठ्या संख्येने धार्मिक स्थळी भेट देतील अशी अशा आहे. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी देखील आधीच विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. तसेच एकादशीसाठी सुद्धा अशा विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेसाठी कल्याण ठाणे येथून अक्कलकोट,शिर्डी,खोपोली,गणेशपुरी या स्थळांवर ७ विशेष गाड्या ठाणे विभागाच्या एसटी महामंडळाकडून सोडण्यात येत आहेत. प्रवाशांना जाण्यासाठी तसेच येण्यासाठी ही व्यवस्था उपलब्ध असेल.
Ganpati Railway Special : कोकणात जाणाऱ्या जादा गाड्या पण हाऊसफुल्ल ; मात्र रेल्वेने दिली मोठी बातमी
गाड्यांचे वेळापत्रक
- ठाणे ते अक्कलकोट 55 रुपये असणार असून या गाड्या 12 जुलै पासून संध्याकाळी लोकमान्यनगर व खोपट येथून रात्री सुटेल.
- कल्याण ते अक्कलकोट- ६७० रुपये.
- ठाणे ते शिर्डी बस- ३७५ रुपये.
- कल्याण ते अक्कलकोट, ठाणे ते शिर्डी बस लोकमान्यनगर आणि खोपट येथूनच सुटेल.
- गणेशपुरीचे ८० आणि खोपोलीचे गगनगिरी महाराज मठाचे भाडे १०५ रुपये.
- गणेशपुरी आणि खोपोलीसाठीच्या जादा बसेस खोपट येथून सोडण्यात येईल.