29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeKalyan-Dombivliदिवा शहरात क्लस्टरच्या सर्वेक्षणाला सुरुवात ; दिवेकरांना अधिकृत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

दिवा शहरात क्लस्टरच्या सर्वेक्षणाला सुरुवात ; दिवेकरांना अधिकृत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

डोंबिवली (शंकर जाधव)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना सुरू केली. या योजनेचे ४५ यूआरपी तयार केले असून ठाणे शहरात सहा ठिकाणी क्लस्टर सर्वेक्षणाला सुरुवात केली असून दिवा शहरात देखील सर्वेक्षण सुरू करावे अशी मागणी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केली होती. फेब्रुवारी महिन्यात दिवा शहरातील क्लस्टर सर्वेक्षणाला मंजूरी मिळाल्यानंतर मार्च महिन्यात निविदा सुद्धा काढण्यात आली. नुकतीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिव्यातील क्लस्टर सर्वेक्षणाला तात्काळ सुरुवात केली जाणार असल्याचे दिवावसीयांना सांगितले. सदर सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याचे रमाकांत मढवी यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोगलशाही स्विकारली आहे : चंद्रशेखर बावनकुळे

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे दिवा शहरप्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी, क्लस्टर योजनेचे सर्वेक्षण विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील व सहाय्यक आयुक्त अक्षय गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिवा विभागात क्लस्टर सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात रहिवाशांच्या घरांना व व्यावसायिक गाळ्यांना क्रमांक टाकण्यात येतील व त्यानंतर नागरिकांकडून कागदपत्र मागवली जातील असे सर्वेक्षण करणाऱ्या प्रमुखांनी सांगितले. दिवा शहरातील नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या टीमला सहकार्य करावे अशी विनंती सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक अमर पाटील, अँड.आदेश भगत, विभागप्रमुख उमेश भगत, निलेश पाटील, भालचंद्र भगत, गुरुनाथ पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वक्तव्या विरोधात दिवा शहरात भाजपच आंदोलन

भंडार्ली घनकचरा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा आता क्लस्टरला विरोध- रमाकांत मढवी, ( माजी उपमहापौर )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवेकरांना दिलेल्या शब्दानुसार लवकरच दिव्यातील डम्पिंग बंद होणारच आहे शिवाय क्लस्टर योजना देखील सुरू झाली आहे.भंडार्ली प्रकल्प झाल्यास दिव्यातील डम्पिंग बंद होणार म्हणून भंडार्ली प्रकल्पला विरोध करणारे आता क्लस्टरला विरोध करून दिवेकरांच्या विकासाच्या आड येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांकडून क्लस्टर बाबत जाणून बुजून उठविण्यात येणाऱ्या अफवांवर दिवेकरांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन रमाकांत मढवी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »