29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी काय आहेत एकनाथ शिंदेचे उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव ?

काय आहेत एकनाथ शिंदेचे उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव ?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेत (Shivsena) गोंधळ उडाला आहे. अहवालानुसार एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमधील (Gujrat) सुरत येथे ११ पेक्षा जास्त आमदारांसोबत एका हॉटेलमध्ये आहेत. ते गुजरात मध्ये असल्याने अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. दुपारी एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

 
– कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजप सोबत सरकार स्थापन करावे  
– देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील.  
– भाजप सोबत सत्ता स्थापन करावी. 

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असून भाजपच्या नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे. शिवसेना सत्ताधारी उद्धव ठाकरे शिंदेंना सतत कॉल करत आहेत परंतु त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्याने ठाकरेंची धाकधूक वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी जर शिवसेनेला रामराम केला तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ झालेली दिसून येतेय.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा फोन नॉटरिचेबल लागल्याने राज्यामध्ये खळबळ झाली आहे. विधानपरिषदेतील निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजप कडून धक्का दिला, त्यानंतर एकनाथ शिंदे अचानक गायब झाल्याने अनेक चर्चा होत आहेत. निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार विजयी झाले असून काँग्रेस आणि शिवसेनेची मत फुटली. त्यात एकनाथ शिंदेंना संपर्क होत नसल्याने ते बंड पुकारत आहे अशी शक्यता दर्शवली जात होती.

एकनाथ शिंदे सध्या सुरतमध्ये असून त्याच्यासोबत जवळपास २५ आमदारांची हजेरी असल्याची बातमी मिळत आहे. एकनाथ शिंदेंसोबत तानाजी सावंत,ज्ञानराज चौघुले,संजय राठोड,अपक्ष आमदार जयस्वाल (रामटेक), शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), यवतमाळचे पालकमंत्री भुमरे,भरत गोगावले (महाड),विश्वनाथ भोईर(कल्याण पश्चिम),बालाजी किणीकर(अंबरनाथ),महेंद्र दळवी(अलिबाग), महेंद्र थोरवे(कर्जत), प्रताप सरनाईक,अनिल बाबर(खानापूर), सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, सुहास कांदे ( नांदगाव- यांचा देखील फोन बंद), दादा भुसे,संजय शिंदे,प्रकाश आबिटकर (कोल्हापूर) हे असल्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »