डोंबिवली (शंकर जाधव)
शालेय जीवनात आर्थिक व्यवहार माहिती असावेत असा उद्देश समोर ठेवून शाळेतच विद्यार्थ्यांची बँक सुरू केलेल्या व अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतलेल्या जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिरात उन्हाळी शिबिर भरविण्यात आले होते.या शिबीरात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभागी दिसला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या शाळेत भरविण्यात आलेल्या उन्हाळी शिबिरात सहभागी झाले होते.मुलांचा बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास होणे ही आजची मूलभूत गरज आहे.बाहेरच्या वातावरणामध्ये असणाऱ्या ह्या गोष्टींचा प्रभाव मुलांवर पडतो त्यासाठीच अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.ह्या कार्यक्रमात पालकांचाही प्रतिसाद उत्तम होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना आणि नटराज पूजन करून झाली. डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी शिबिराचे महत्व आणि त्यामुळे मुलांचा होणारा सर्वांगीण विकास यावर छोटेखानी भाषण देऊन मुलांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित केला. ह्या शिबिरामध्ये सकाळी 11 ते 3 ह्या वेळात वेळापत्रकाप्रमाणे सर्व कलागुण शिकवले जायचे. राष्ट्रगीत व सरस्वती श्लोक म्हणून शिबिराला सुरुवात होत असे. शिक्षिका ललिता या रोज मुलांना भगवतगीतेचे संस्कृत दोन अध्याय अर्थासहीत वाचून आणि मुलांकडून वदवून घेत होते.प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ मुलांना शिकवून व खाऊ घातले जात होते. शिरा, पोहे, उपमा, संडविच, भेळ,असे पदार्थ बनवण्याची रेलचेल असायची.चित्रकला, हस्तकला, नाटक, संगीत, नृत्य, या सर्वांचे वर्ग घेऊन स्पर्धा ही घेण्यात आल्या. शाळेच्या शिक्षकां व्यक्तिरिक्त बाहेरील कलाकार येऊन त्यांनी मुलांना शिकवण्याचे काम व मार्गदर्शन केले. स्पर्धक विजेत्या मुलांना प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी मुलांना देखील प्रमाण पत्र देण्यात आले.
बेस्ट कॅम्पर म्हणूनही त्यांना बक्षीस देण्यात आले. मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बदलापूर येथे फार्म हाऊसवर त्यांची एक दिवसीय सहलीचे आयोजन केले होते. सर्व मुलांनी उस्फुर्त पने ह्या सहलीचा आनंद घेतला म्हणण्यापेक्षा लुटला. मनसोक्त पणें पोहणे, खेळणे, निसर्गाच्या सानिध्यात बागडणे ह्याचा आनंद ओसंडून वाहत होता.उन्हाची तमा न बाळगता स्वच्छंदी पणाने फिरणे हेच ह्या शिबिराचे आणि मुलांचे खास वैशिष्ठ होते.जेवणापूर्वी हात पाय धुवून, हात जोडून डोळे मिटून श्लोक म्हणल्यावरच डबा खायचा हे ह्या मुलांच्या अंगवळणी पडले होते आणि अशा संस्काराची सुरुवात अशाच शिबिरातून होते. मुलांना सतत कार्यरत ठेवण्यासाठी १५ शिक्षकांचा स्टाफ नेहमीच ह्या कामात तत्पर होता. सर्व ॲक्टिविटी शिक्षिका, माऊशी,काका सर्वांनीच ह्या शिबिरात हिरीरीने सहभाग दर्शवून मोलाची कामगिरी बजावली. सांगता समारोपाला अतिथी आणि डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी हजेरी लावून पुन्हा एकदा मुलांना मार्गदर्शन करून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला.मुलांनी व पालकांनी त्यांचे अनुभव सांगून कार्यक्रमाची रंगत वाढवली.सर्वांचे आभार मानून वंदे मातरम् ने शिबिराची सांगता झाली.