नमस्कार,आपल्या आजूबाजूला घडणा-या घडामोडी, समस्या, चांगल्या-वाईट घटना या जाणून घेणे आपले कर्तव्य आहेच, पण भविष्यातील संधी, आजच्या तरुणाईला आकर्षित करणारे गॅजेट्स, बाजारात येणारी नवनवीन उत्पादने, करिअर संधी, गुंतवणूक मार्गदर्शन इत्यादींची माहितीही आपल्या आणि सोप्या भाषेमध्ये उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. वृत्तपत्रांच्या भाऊगर्दीमध्ये आपल्याला नेमका हवा असलेला कन्टेन्ट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. या विचारार्थी मायमराठीन्यूजडॉटकॉम maaymarathinews.com या मराठी वेबसाईटचे अनावरण आम्ही करत आहोत. अनुभवी संपादक, बातमीदार, छायाचित्रक यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने प्रत्येक बातमीस योग्य न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पण त्यासोबतच आपण जनसंपर्क अधिकारी म्हणून विविध कंपन्या, संस्था, ब्रॅण्ड आस्थापनासाठी योग्य तो कॉलम राखीव ठेवत आहोत. त्याकरताच तुमच्या सहकार्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. तुमच्या माध्यमातून अनेक उत्तम लेख, मुलाखती, महत्वाच्या बातम्या, विश्लेषण व इतर मार्गदर्शन वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे.
Contact us: maaymarathinews@gmail.com
© Maay Marathi News 2021, Curated with ❤ and > by feder.in