आम्हाला तैवानसोबत (Taiwan) असणाऱ्या मैत्रीचा सार्थ अभिमान आहे असं म्हणत नॅन्सी पलोसी आणि तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी तैपई येथील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयामध्ये भेट घेतली. चीनच्या विरोधाला न जुमानता नॅन्सी यांनी तैवानमध्ये प्रवेश केला. चीनने आक्रमक भूमिका घेतली असली तरी आम्ही तैवानला एकटे सोडणार नाही, असे आश्वासन अमेरिकेच्या वतीने नॅन्सी पेलोसी यांनी दिले आहे. तैवानसोबतच्या आमच्या मैत्रीचा आम्हाला खूप अभिमान आहे, असेही नॅन्सी पेलोसी म्हणाल्या.
तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी नॅन्सी पेलोसी यांना भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आमची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे वचनही वेन यांनी अमेरिकेला दिले. आम्हाला सतत लष्करी कारवाईची धमकी दिली जाते. पण तैवान त्यापुढे झुकणार नाही. आम्ही आमचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी आणि देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू, जगभरातील सर्व लोकशाही देशांसोबत काम करताना, आम्ही आमच्या लोकशाही मूल्यांची जपणूक करतो असेही त्साई इंग-वेन म्हणाल्या.
#WATCH | US House of Representatives Speaker Nancy Pelosi arrives in Taipei, Taiwan.
— ANI (@ANI) August 2, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/cEgWZUbZ0m
या दरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी काल (३ ऑगस्ट) पुन्हा अमेरिकेला धमकी दिली. ते म्हणाले, अमेरिका पेलोसींच्या दौऱ्यावरुन राजकारण करत आहे. अमेरिकेला याची किंमत मोजावी लागेल. या सर्वांचे परिणाम चांगले होणार नाहीत.
त्साई इंग-वेन म्हणाल्या की त्या शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी वचनबद्ध आहे. तैवानला जागतिक व्यापारातील सर्वात स्थिर आणि सुरक्षित देश बनवण्याचा संकल्प देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला. ”तैवान हा अमेरिकेसाठी सर्वात विश्वासार्ह देश आहे. आम्ही अमेरिकेसोबत काम करत राहू. आम्ही इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि स्थैर्यासाठीही प्रयत्नशील आहोत. अशा प्रकारे आम्ही आर्थिक समृद्धी, कौशल्य विकासाला चालना देत आहोत. पुरवठा आणि मागणी यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून तैवान-अमेरिका संबंध सुधारण्यासाठीसुद्धा प्रयत्न करू” असे त्साई इंग-वेन म्हणाल्या.
Income tax return: तुम्ही आयटीआर च्या पुढचा हा टप्पा पूर्ण केला का?
मंगळवारी रात्री पलोसी तैपेई विमानतळावर उतरल्यानंतर चीनने तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली. युक्रेन आणि रशियामधील संघर्ष सुरु असताना आता चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आशिया खंडात युद्धाची भीती निर्माण झाली आहे.
एक चीन धोरणांतर्गत चीन तैवानला आपला भूभाग मानतो. दुसरीकडे, तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणवतो. चीन तैवानवर चीनच्या राजकीय मागण्यांपुढे झुकण्यासाठी आणि चिनी कब्जा मान्य करण्यासाठी दबाव टाकत आहे. दुसरीकडे अमेरिकेने चीनचे वन चायना धोरण स्वीकारले असले तरी त्यात तैवानचा सहभाग नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. या कारणामुळे तैवानमध्ये ताणतणावाचे वातावरण आहे.