29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी Tanushree Datta: तनुश्रीचा नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा नवा आरोप

Tanushree Datta: तनुश्रीचा नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा नवा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Datta) बऱ्याच वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. #MeToo या कारणामुळे तनुश्री प्रसिद्धीच्या झोतात आली होती. २००८ मध्ये तनुश्रीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. प्रकरण न्यायालयात देखील पोहोचले होते. आता पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. कारण तनुश्रीने इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती नाना पाटेकरांबद्दलचा राग व्यक्त करत आहे.

तनुश्रीने नाना पाटेकरांबद्दलची पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिला काही झाले तर त्याला नाना पाटेकर जबाबदार असतील. त्यामुळे नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ताचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मला काही झाले तर नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि टीम व बॉलीवूडचे माफिया मित्र जबाबदार असतील. कोण आहेत बॉलीवूड माफिया? सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ज्या लोकांची नावे समोर आली ते बॉलीवूडचे माफिया आहेत. (त्या सर्वांचे वकील सारखे होते.)”
ती पुढे म्हणाली, “बॉलिवुड माफियांचे असे सिनेमे पाहू नका. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार घाला. काही इंडस्ट्रीतील लोक आणि पत्रकार माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवतात. ज्यांनी मला दुखावले त्यांचे आयुष्य नरक बनवा. मी कायदा आणि न्यायात अपयशी ठरले. पण माझा या महान राष्ट्राच्या लोकांवर विश्वास आहे. जय हिंद आणि अलविदा. पुन्हा भेटू.” ही पोस्ट पाहिल्यानंतर “तुम्हाला पुन्हा प्रसिद्धी हवी आहे का?” असा सवाल नेटिझन्स तनुश्रीला कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »