डोंबिवली ( शंकर जाधव ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाच्या वतीने रोटरी इंडिया साक्षरता मिशन अंतर्गत शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या अमूल्य शैक्षणिक योगदानाबद्दल आणि शिक्षणाव्यतिरिक्त साहित्य, सामाजिक , सांस्कृतिक इ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांसाठी ‘नेशन बिल्डर अवॉर्ड – २०२२’ आयोजन करण्यात आले होते. असे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे प्रेसिडेन्ट दिनेश खरोटे यांनी कळविले.
यावेळी एकुण मुंबई पासून मुरबाड च्या दुर्गम भागातील १५ शाळांमधील १९ शिक्षकांची त्यांच्या विशेष कार्यासाठी ‘नेशन बिल्डर पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डोंबिवलीचे वरिष्ट पोलिस निरीक्षक मा. सचिन सांडभोर यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले . त्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . डोंबिवलीतील ग्रीन्स इंग्लीश स्कूलच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला . त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रो. शिरीष देशपांडे व रो. प्रकाश शाह यांनी बहारदार पद्धतीने केले. तसेच कार्यक्रमाचा समारोप निवेदन माजी महापौर व रोटरीयन शरद गंभीरराव यांनी केले.