गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. युपी, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान सोबतच अनेक राज्यांमध्ये तापमानात वाढ होत आहे. त्यातच हवामान विभागाने नुकतीच एक भविष्यवाणी केली आहे जी ऐकून तुम्हाला हादरा बसेल. हवामान विभागाने सांगितले आहे की यावर्षी तापमान ५० डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण मे महिन्यामध्ये सर्वात जास्त गरम होते. त्यामुळे पश्चिम राजस्थानच्या काही भागांमध्ये तापमान ५० डिग्री सेल्सियस असू शकते.
परंतु हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान आहे सर्वोच्च तापमान ५२.६ डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे.
उष्णतेच्या लाटेने सोबतच एक आनंदाची बातमी.
हवामान विभागाने सांगितला आहे की भिन्न राज्यांमध्ये उष्णतेची लाट पसरतच आहे पण त्याच सोबत एक आनंदाची बातमी देखील हवामान खात्याने दिली आहे. कारण या वर्षी पावसाळा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत देशभरात मार्च मार्च पासून आतापर्यंत 32 मिलि मीटर इतका पाऊस पडला आहे. मे महिन्यामध्ये यावेळेस 109 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम, मध्य व वायव्य भागांमध्ये अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. याठिकाणी तापमान नेहमीपेक्षा जास्त असल्याची चिन्हे दर्शवली जात आहेत.
यूपी चा पारा ४७ डिग्री च्या पुढे
उत्तर प्रदेशातील बांदा येथे तापमान ४७.४ डिग्री सेल्सियस इतका नोंदवला गेला आहे. त्या शिवाय अजून इतर काही ठिकाणी देखील या महिन्यातला सर्वोच्च तापमानाचा अंक आहे. उत्तर प्रदेश मधील प्रयागराज झांसी आणि लखनऊ मध्ये तापमान ४६.५आठ आणि से ४०.२ डिग्री सेल्सियस असा नोंदवला आहे.
हरियाणा मधील गुरुग्राम आणि मध्यप्रदेश मधील सतना इथे या महिन्यात सर्वोच्च तापमान ४५.९ डिग्री सेल्सिअस आहे तर ४५.३ ते ४० डिग्री सेल्सिअस इतका नोंदवलेला आहे. तसेच दिल्लीमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वेधशाळा येथे ४६.४ इतके सर्वोच्च तापमान तर राजस्थान मधील श्रीगंगानगर मध्ये ४६.४ डिग्री सेल्सिअस तर मध्य प्रदेश येथील नऊ गाव मध्ये ४३.२ डिग्री सेल्सिअस व महाराष्ट्र मधील चंद्रपूर मध्ये ४६.४ डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदवले आहे.