31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeKalyan-Dombivliडोंबिवली मोठा गाव येथील दिवा वसई रेल्वे मार्गावरील गेटमन फाटक उघडे ठेवून...

डोंबिवली मोठा गाव येथील दिवा वसई रेल्वे मार्गावरील गेटमन फाटक उघडे ठेवून चक्क केबिन मध्ये झोपला

डोंबिवली (शंकर जाधव)

डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील दिवा वसई रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक उघडे ठेवून चक्क केबिन मध्ये झोपल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात व्हायरल होत आहे. फाटक उघडे राहिल्याने ट्रेन येत नसल्याचे समजून नागरिक व वाहनचालक बिनदास्तपणे फाटक ओलांडून ये-जा करत होते. नागरिकांचा जीव धोक्यात असे समजल्यावर एका जागरूक नागरिकाने सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना हा प्रकार दिसला.

हा प्रकार रेल्वे प्रशासनाला समजला पाहिजे आणि नागरिकांना माहिती मिळावी म्हणून जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. गेटमनवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली आहे. येथील फाटक उघडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गेटमनची नेमणूक नेमण्यात केली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथील फाटक उघडे ठेऊन हा गेटमन केबिनचा दरवाजा बंद करून झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

डोंबिवलीतील उद्योजकांना महावितरण कंपनीकडून सुरक्षा अनामत रक्कम भरण्यासाठी नोटिसा

या मार्गावरून रात्रीच्या वेळी धावणारी रेल्वे येत असताना आजूबाजूच्या नागरिकांना गाडीचा हॉर्न ऐकू आल्याने नेहमीप्रमाणे नागरिकांनी फाटक ओलांडणे थांबवले. मात्र बराच वेळ फाटक बंद होत नसल्याने फाटक बंद का होत नाही हे पाहण्यासाठी नागरिक केबिनकडे गेले. केबिनमध्ये गेटमन झोपल्याचे पाहून नागरिक संतापले. हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करून नागरिकांनी गेटमनला उठवले. रेल्वे गाडी येत असल्याचे सांगताच गेटमन जागा झाला आणि त्याने गेट बंद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »