31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी या डायरेक्टरने दिले थेट शिवसेनेला आव्हान

या डायरेक्टरने दिले थेट शिवसेनेला आव्हान

2022 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचाही समावेश करण्यात आला आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची आणि त्यावेळची खरी परिस्थिती या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपटही वादात सापडला आहे. मात्र, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली नाही आणि द काश्मीर फाइल्सला चांगला प्रतिसाद दिला. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री या चित्रपटाचा सिक्वेल (Sequel) घेऊन येत आहेत.

विवेकने ट्विटरवर (Twitter) ‘द काश्मीर फाइल्स’च्या सिक्वेलची घोषणा करणारी एक पोस्ट शेअर (Post share) केली आहे. विवेकने पोस्टमध्ये लिहिले की, ‘अनेक दहशतवादी संघटना, पाकिस्तानी, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि आता शिवसेना तसेच शहरी नक्षलवादी मला ‘द काश्मीर फाइल्स 2’ बद्दल विचारत आहेत. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी कोणालाही निराश करणार नाही. फक्त तुमची प्रतिकारशक्ती वाढवा.” विवेक अग्निहोत्रीचे हे ट्विट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ मध्ये ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करताना त्यांना मोठ्या पडद्यावर दाखवण्याचे धाडस विवेक अग्निहोत्रीने केले होते. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. आता, विवेक अग्निहोत्रीने ‘द काश्मीर फाइल्स 2’ चा सिक्वेल रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचे नाव ‘द दिल्ली फाइल्स’ आहे. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्च 2022 रोजी रिलीज झाला होता. अवघ्या 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली.

‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट लोकांना आवडला, पण काहींनी त्यावर टीकाही केली. प्रकाश राज आणि नाना पाटेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी काश्मीर फाइल्सवर टीका केली होती. समाजात फूट पाडणारा असे या चित्रपटाचे वर्णनही करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »