डोंबिवली (शंकर जाधव)
डोंबिवली शहातील रस्ते कॉंक्रीटीकरणातून होणार असल्याने डोंबिवलीकरांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहे. दरवर्षीच्या खड्ड्यांचा प्रश्न, वाहनांचा अपघात आणि वाहतूक कोंडी यातून डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. आपल्या शहरातील रस्ता आता कॉंक्रीटीकरण होणार असल्याने या सरकारचे आभार मानत अशी विकासाची कामे शहरात होतील असा विश्वास माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी व्यक्त केला.
डोंबिवली पश्चिमेकडील पांडूशेठ बाळा जोशी चौक (स.है.जोंधळे शाळा) ते जुनी डोंबिवली पर्यतचा रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या विकास कामाचा शुभारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणिसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी माजी नगरसेविका वृषाली जोशी, माजी नगरसेवक रणजीत जोशी, बाळासाहेबांची शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दिपेश म्हात्रे, गजानन व्यापारी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेविका जोशी म्हणाले, खासदार डॉ. शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नाने आज माझ्या शहरातील रस्ते आता कॉंक्रीटीकरण होणार आहेत. माझ्या गावकीचा रस्ता अनेक वर्ष डांबरीकरण आणि डागडुजी होत होती. साडे १३ कोटीचा निधी माझ्या प्रभागासाठी मंजूर झाल्याबद्दल त्याचेआभार मानते. या विकास कामा माजी महावौर विनिरा राणे यांचेही फार मोठे सहकार्य लाभले.