डोंबिवली (शंकर जाधव)
रेल्वे गाडीतून पडून एका १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २४ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात मृत्यू पावलेला मुलगा डोंबिवली पूर्वेकडील नंदिवली परिसरात राहत होता.
एकाच दिवशी दोघांचा रेल्वे अपघातात मृत्यू
रेल्वे गाडीची ठोकर लागून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार 24 तारखेला घडली.सायंकाळी साड़े सात वाजण्याच्या सुमारास कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान आणि दुसरा अपघात याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झाला. या अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची ओळख अद्याप पटली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
रेल्वे गाडीतून पडून तरुणाचा मृत्यू
रेल्वे गाडीतून पडून एका ३१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार २५ तारखेला डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान तरी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.शिधनाथ वैद्यनाथ पात्रा असे या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.