कल्याण ( शंकर जाधव ) वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे हे वाहतूक पोलिसांचे काम असते. मात्र रस्त्यात खड्डे पडल्याने वाहनचालकाचा अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी पुढे येत रस्त्यातील खड्डे बुजवले. कल्याणमधील गांधारी पुलाजवळ रस्त्यात खड्डे पडल्याने वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत खड्डे बुजवले. वाहतूक पोलिसांचे हे काम पाहून परिसरातील नागरिकांनी आभार मानले. तर वाहनचालकांनी पोलिसांना हात मिळवून त्याच्या या कार्याला सलाम केला.