डोंबिवली ( शंकर जाधव ) १ जून 2015 रोजी राज्य सरकारने २७ गावे कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केली.मात्र गावातील सरकारी सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीची चिंता आहे.या कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक कामगार संघ (युनियन)ने शासन दरबारी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.शुक्रवारी डोंबिवली महानगर सफाई कामगार संघ संलग्न औद्योगिक कामगार संघ (युनियन) फलकाच्या उदघाटन प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत गायकवाड यांनी ही मागणी केली.
सोनारपाडा औद्योगिक चौकात संघटनेच्या फलकाचे अनावरण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत गायकवाड, महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील, महेश गायकवाड, नवीन गवळी, संघटक राहुल पाटील, डोंबिवली अध्यक्ष शांताराम शेलार, कार्याध्यक्ष गोरखनाथ महाले, उपाध्यक्ष लेनिन अशोक, सचिव संदीप सानप आदी कार्यकारणी कामगारांच्या प्रश्नासाठी कार्यरत आहे. सोनारपाडा औद्योगिक चौकात संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तेव्हा मोठ्या संख्येने पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष शांताराम शेलार म्हणाले, डोंबिवली औद्योगिक विभागात असलेल्या कारखान्यातून कामगार ठेकेदार पद्धतीने तसेच कायमस्वरूपी स्वरूपात काम करीत आहेत. त्यांना अडीअडचणीच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी तसेच शासन संबंधित कामाची माहिती, शासकीय वैद्यकीय फायदे मिळवून देण्यास संघटना वेळोवेळी मदत करेल. तर गोरखनाथ महाले यांनी सांगितले की, कायमस्वरूपी काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या, अडचणी इतर योजनांचा फायदा मिळवून देण्यास संघटना मदत करणार आहे. सफाई कामगारांचा मोठा प्रश्न असून तो सोडवण्यासाठी संघटना काम करणार आहे. यावेळी महेश पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कामगारांसाठी वेळ द्या आणि त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून द्या असे सांगितले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.