डोंबिवली (शंकर जाधव) गुटख्याची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलीस उपायुक्तांच्या पथकाने गुटख्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली. शनिवारी रात्री कंटेनरमध्ये असलेला 25 लाख रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. कर्नाटकहून उल्हासनगरला कंटेनरमध्ये जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पोलिस कर्मचारी संजय पाटील अणि ऋषिकेश भालेराव यांना कल्याण पश्चिमेला गांधारी रोडवर गुटख्याचा कंटेनर येणार असल्याची माहिती मिळाली. कल्याण पोलीस उपायुक्त पथकाने गांधारी रोडवर सापळा रचला. भिवंडी पडघा मार्गे कल्याणमध्ये येत असलेल्या कंटनेर पोलिसांनी अडविला. त्या कंटेनरमध्ये फो के स्टार हा गुटखा असल्याचे मिळून आले. या गुटख्याची किंमत 25 लाख रुपये असून पोलिसांनी या गुटख्याची तस्करी करणाऱ्या कंटनेर चालक मशाक इनामदार याला अटक केली असून तो कर्नाटक येथील राहणारा आहे. लव सहानी, प्रेमचंद वाठोरे या दोघांना अटक करण्यात आली. हा गुटखा कर्नाटकहून उल्हासनगरला आणण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे.