डोंबिवली (शंकर जाधव)
‘घर घर तिरंगा’ डोंबिवली येथील कार्यक्रमात डोंबिवली रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालकांना 3000 हजार तिरंग्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे, दत्ता माळेकर, संजय देसले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. इंदिरा चौकात रिक्षाचालकांना तिरंगा देत असताना ‘ वंदे मातरम’ म्हणत प्रत्येक भारतीयांना आपल्या घरावर, दुकानावर आणि रिक्षाचालकांनी तिरंगा लावण्याची विंनती केली.