दोन पिस्तूल, ४ जिवंत काडतुस हस्तगत
डोंबिवली ( शंकर जाधव ) :- गावठी पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या एका तरुणास मानपाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली.अटक केलेल्या तरुणाकडून पोलिसांनी गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस हस्तगत केली.अटक केलेल्या तरुणाने याआधी सातारा येथे एकास गावठी पिस्तुल विकले होते.त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकून त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस हस्तगत केले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम करवले आणि अक्षय जाधव असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
परशुराम हा डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंगवाडी येथे गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती.या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून परशुरामला अटक करून त्यांच्याकडील एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुस हस्तगत केली.परशुराम याने याआधी देखील सातारा येथील अक्षय जाधव या तरुणाला गावठी पिस्तूल विठ्ठलाची माहिती समोर आली. मानपाडा पोलिसांनी सातारा येथून सापळा रचत अक्षय जाधव याला देखील अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व ०२ जिवंत काडतुस हस्तगत आले. परशुराम व अक्षय हे दोन्ही सातारा येथील रेकॉर्ड वरील आरोपी असून त्यांच्या विरोधात कराड ,वडुज , सातारा अवैध शस्त्र विक्री व वाळु चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परशुराम करवले व अक्षय जाधव यांनी याआधी काही पिस्तल खरेदी विक्री केलेत का ? दोघे पिस्तूल कुठून आणत होताते ?याचा तपास पोलीस करत आहेत..