डोंबिवली (शंकर जाधव)
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळील पी पी चेंबरसमोर काही दिवसांपासून रिक्षाचालकांनी अनधिकृत रिक्षा थांबा बनविल्यास सुरुवात केली होती. या थांब्यामुळे वळणावर अपघाताची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी येथील अनधिकृत रिक्षा थांबा हटविला. वाहतूक पोलिसांनी वेळीच याकडे लक्ष दिल्याने नागरिक व वाहनचालकांनी आभार मानले.
डोंबिवलीत अनधिकृत रिक्षा थांब्याची संख्या वाढत असताना ‘दिसेल तिकडे रिक्षा थांबा’ अशी परिस्थिती आहे.काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेकडील पी पी चेंबर प्रवेशद्वारासमोर अनधिकृत रिक्षा थांबा सुरू झाला होता. इंदिरा चौकातून उजव्या हाताला वाहन वळविल्यानंतर पुढे सारस्वत बँकेच्या दिशेने जाताना पी पी चेंबरसमोर अनधिकृत रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या असल्याने अपघाताची शक्यता होती.
वाहनचालक या अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे पुरते वैतागले होते.येथील रस्त्यावर अपघात होऊ नये वाहतुक पोलिस गेले दोन दिवस कारवाई करत आहेत. कारवाईला घाबरून रिक्षाचालकांनी पी पी चेंबर समोरील अनधिकृत रिक्षा थांब्यावर रिक्षण उभ्या करणे बंद केले. येथील अनधिकृत रिक्षा थांबा हटविल्याबद्दल डोंबिवली वाहतूक नियंत्रण उपशाखा वपोनि उमेश गित्ते व वाहतूक पोलिसांचे नागरिकांनी आभार मानले.