29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
HomeKalyan-Dombivliपी पी चेंबरसमोर अनधिकृत रिक्षा स्टँड, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा कानाडोळा

पी पी चेंबरसमोर अनधिकृत रिक्षा स्टँड, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा कानाडोळा

डोंबिवली (शंकर जाधव)

डोंबिवली शहरात वाढत्या रिक्षांची संख्या वाहतुकी कोंडीस कारणीभूत ठरत असल्याने डोंबिवलीकर पुरते हैराण झाले आहेत. शहरात आधीच अनधिकृत रिक्षा स्टँडची संख्या वाढली असताना आता त्यात आणखी एका अनधिकृत रिक्षा स्टँडची भर पडली आहे. डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळील पी पी चेंबर समोर अनधिकृत रिक्षा स्टँड बनला आहे. या रस्तावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना या अनधिकृत रिक्षा स्टँडने वाहनचालक संतापले आहे. अनधिकृत रिक्षा स्टँडवर कारवाई उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) चे असून एकही अनधिकृत रिक्षा स्टँडवर कारवाई झालेली नाही. तर वाहतूक पोलिसांनी येथील अनधिकृत रिक्षा स्टँडमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने हे अनधिकृत रिक्षा स्टँड हटविण्यास प्रयत्न करणे आवश्यक झाले आहेत.

अनेक महिन्यांपासून डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळील उर्सेकरवाडी, कामत मेडिकल समोर, पाटकर रोड, इंदिरा चौक येथे अनधिकृत रिक्षा स्टँड आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी येथे पाहणी केली होती. मात्र अनधिकृत रिक्षा स्टँड हटविण्यास आरटीओला यश आले नाही. या अनधिकृत रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकांवर डोंबिवली वाहतूक नियंत्रण उपशाखेकडूनही दंडात्मक कारवाई केली जात नाही. शहरातील स्टेशन जवळील रस्त्याच्या कडेला पार्किंग केली जात असल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.

काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेकडील पी पी चेंबर समोर अनधिकृत रिक्षा स्टँड बनविण्यात आला. आधीच या रस्तावर खाजगी मोठ्या बसेस येत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. यावर जागरूक नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. mho5 वाहतूक संघटना आणि पाम प्रवासी संघटनेने अनेक वेळेला वाहतूक पोलीस आणि आरटीओला शहरातील अनधिकृत रिक्षा स्टँडवर कारवाई करण्याची विंनती केली. मात्र आजवर डोंबिवलीतील एकही अनधिकृत रिक्षा स्टँड हटविले नाहीत. शहरातील अनधिकृत रिक्षा स्टँडची वाढती संख्या पाहता प्रत्येक गल्लीत, चौकात असे रिक्षा स्टँड उभे राहतील अशी चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »